संवर्ग ४ (बदलीपात्र शिक्षक) यांनी आपला बदली
अर्ज कसा भरावा? याबाबत थोडक्यात माहिती .....
* प्रथम आपला संगणक सुरु करून कोणताही ब्राऊझर ओपन (Firefox
उत्तम ठरेल) करून त्यामध्ये edustaff.maharashtra.gov.in इतके सर्च करा.
* आता आपल्यासमोर स्टाफ पोर्टलचे होम पेज येईल.आपल्यासमोर ४
पर्याय असतील त्यापैकी Transfer Portal
वर क्लिक करा.
* यानंतर आपल्यासमोर लॉगीन स्क्रीन येईल. यातील Select Role समोर Head Master निवडा.
आपल्या शाळेचा U-dise क्रमांक User id च्या ठिकाणी टाका व
त्याखाली अचूक पासवर्ड टाका. (कॅप्चा कोड टाका किंवा तो येत नसल्यास डायरेक्ट
login बटनावर क्लिक करा. )
* पुढील पानावर आपल्या समोर काही tab दिसतील त्यापैकी Intra-district Transfer या tab वर क्लिक
करून त्यातील TUC Application निवडा.
* यानंतर आपणास आपले पद निवडण्यास Select Designation
निवडून त्याखालील Select Teacher मधून आपले नाव निवडावे लागेल.
( आपण स्टाफ पोर्टलला आपली जी बेसिक माहिती भरली आहे त्या आधारे
महत्वाची सेवेसंबंधी माहिती फॉर्मच्या सुरुवातीला आपोआप येईल.)
Transfer Under Consideration या पिवळ्या रंगाच्या tab ला क्लिक करा.
(खालील
दोघांपैकी एक पर्याय निवडावा.)
Administrative Ground Request Ground
(खो बसल्यावरच बदली
होईल)
(विनंती बदली हवी असल्यास)
·
यानंतर आपला विषय निवडा (१
ते ५ इयत्ताकरिता शिकवणाऱ्या शिक्षकांनी All Subject निवडावा.) त्यानंतर पती-पत्नी
एकत्रीकरण लाभ घ्यायचा असेल तर Yes व नसेल तर No निवडावा.( ऐच्छिक आहे.)
·
List/ Selected Preferences
ची उजवीकडील साईडपट्टी स्क्रोल करा. आपणासमोर Details of Preferences हा पर्याय
पूर्ण स्वरुपात दिसेल.
·
आता आपल्या पसंतीक्रमाच्या
२० शाळा भरण्यासाठी खालील Tab दिसतील.
District(जिल्हा निवडा)
Taluka(निवडलेल्या शाळेचा तालुका निवडा)
Village (शाळेचे
महसुली गाव)
* महसुली गाव निवडल्यावर त्यातील
उपलब्ध शाळा दिसतील, आपणास हवी असणारी शाळा निवडा.
उजव्या बाजूला असणार्या
या Tab वर क्लिक करा.
उजव्या बाजूला असणार्या
Add Preferences
|
थोड्या वेळातच आपण निवडलेली शाळा List
of Selected Preferences ला दिसेल. (सदर प्रक्रिया होत असताना घाई किंवा गडबड
करू नये.
एक शाळा Add झाल्याशिवाय दुसरी शाळा निवडू नये.)
याप्रकारे आपल्या पसंतीक्रमानुसार जास्तीत जास्त २० शाळा निवडा.
·
सर्व शाळा भरून झाल्यावर
वरील Save या बटनावर क्लिक करा.
·
आता पुन्हा Intra-district Transfer tab
ला क्लिक करून त्यामधील View option (Draft Version) निवडावे. आपला अर्ज pdf
स्वरुपात दिसेल.
आपण भरलेली माहिती योग्य व अचूक आहे काय याची खात्री करा.
काही बदल अपेक्षित वाटल्यास पुन्हा TUC Application ओपन करून आवश्यक दुरूस्ती करून पुन्हा Save करावा.
आपण भरलेली माहिती योग्य व अचूक आहे काय याची खात्री करा.
काही बदल अपेक्षित वाटल्यास पुन्हा TUC Application ओपन करून आवश्यक दुरूस्ती करून पुन्हा Save करावा.
·
आता आपला फॉर्म Verify
करण्यासाठी Verification of Transfer Application वर क्लिक करा. आपले
नाव निवडा. आपल्या नावासमोरील Print/View
ला क्लिक केले असता आपला फॉर्म pdf स्वरुपात नवीन window मध्ये ओपन होईल.
मागील window वर परत आले असता Verify हा नवीन पर्याय आला असेल तो क्लिक करा.
आपणास यावेळी Are you sure want to verify ? असे विचारले जाईल.
OK करा व नंतर Data Verified Successfully असा रिमार्क आल्यावरच आपला फॉर्म SUBMIT झाला असे समजावे.

आता सर्वात शेवटी बदली अर्ज
प्रिंट काढण्यास Intra-district transfer tab क्लिक करून त्यातील शेवटचे Print
Transfer Application वर क्लीक करून Print/View निवडा.
आपला फॉर्म Verified झालेला pdf स्वरुपात येईल. त्यावर Self Certified असा watermark व मा. कांबळे सो. यांची सही दिसेल. (सही न आल्यास चिंता नसावी, काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.)
आपला फॉर्म Verified झालेला pdf स्वरुपात येईल. त्यावर Self Certified असा watermark व मा. कांबळे सो. यांची सही दिसेल. (सही न आल्यास चिंता नसावी, काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.)
·
उजव्या बाजूला वरील download बटन क्लिक करून आपला बदली अर्ज pdf स्वरुपात डाऊनलोड करा. पूर्ण होताच ओपन करून प्रिंट काढा.
आपला फॉर्म भरणे प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
उजव्या बाजूला वरील download बटन क्लिक करून आपला बदली अर्ज pdf स्वरुपात डाऊनलोड करा. पूर्ण होताच ओपन करून प्रिंट काढा.
आपला फॉर्म भरणे प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
वरील माहिती ही काही मित्रांच्या आग्रहास्तव अनुभवावरून मार्गदर्शनपर टाकली
आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत manual पाहावे.
$$$$$$$$$$ धन्यवाद
$$$$$$$$$$$$$
No comments:
Post a Comment