*श्यामच्या आईचं आज काय करायचं.......?*
_यशोदा सदाशिव साने_
_मृत्यू २ नोव्हेंबर १९१७_
*श्यामची आई* नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो आहे.
ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातलीसुद्धा नव्हती.
कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे पुजावे हे विलक्षण आहे.
गुरुजींची आई कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. नवरा, सासू, सासरे, मुले, आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तीचं स्थान काय म्हणून कायम आहे?
वसंत बापट यांनी साने गुरुजींच्या एका नातेवाईकाला मोठ्या उत्सुकतेने विचारले होते की *कशी होती हो गुरुजींची आई?* तेव्हा तुसडेपणाने ते म्हणाले की *अहो काही विशेष नव्हती. चार चौघीसारखी दिसायची.काही वेगळी नव्हती.*
यावर वसंत बापट लिहितात की *सामान्य असण्यातील हेच तिचे असामान्यत्व आहे.*
मला ‘शिक्षण विषयाच्या या लेखमालेत म्हणून गुरुजींच्या आईवर का लिहावेसे वाटते? महात्मा गांधी म्हणत की *'आई हे मुलाचे पहिले विद्यापीठ आहे’*.या वाक्याच्या प्रकाशात गुरुजींची आई हीच एक शाळा आहे. शाळेत मूल असते ६ तास आणि उरलेले १८ तास घरात असते. त्याच्या आयुष्यात शाळा खूप उशिरा येते. सुरवातीची महत्वाची वर्षे या आईच्या विद्यापीठातच तर जातात. तेव्हा शाळा जीवनात काय करते याचे मूल्यमापन करताना आई नावाच्या शाळेत मूल काय शिकते आणि त्यापेक्षा काय शिकायला पाहिजे? हे या स्मृती शताब्दीच्या दिवशी आपण विचार करू या...
त्यासाठी अगोदर श्यामच्या आईची वैशिष्ठ्ये कोणती? ती महाराष्ट्राला एवढी का भावली? हे लक्षात घ्यायला हवे.
*‘श्यामची आई’* कोणतेच तत्वज्ञान सांगत नाही. ती एक सोशीक भारतीय महिला आहे. अविरत कष्ट, सोशीकता आणि अपार समजूतदारपणा यांनी तीचं आयुष्य व्यापलेलं आहे. त्यामुळे ती आजच्या नव्या पिढीच्या तथाकथित स्वातंत्र्यवादी महिलांना आदर्श वाटणार नाही, पण तिचे ते समर्पण केवळ गुलामी म्हणून बघता येणार नाही. ती हलाखीच्या दारिद्रयात अत्यंत स्वाभिमानी आहे.स्वत:च्या वडिलांना ही ती दरिद्रयात आम्ही आमचे बघून घेऊ हे सुनावते. सावकाराचा माणूस घरावर जप्ती आणू शकतो हे माहीत असूनही त्याने स्त्री म्हणून तिच्यावर शेरेबाजी करताच ती नागिणीसारखी परिणामाची पर्वा न करता त्याच्या अंगावर धावून जाते. हा तिचा दारिद्रयातला स्वाभिमान थक्क करून टाकतो. श्यामने कुठेतरी जेवायला गेल्यावर दक्षिणा आणल्यावर ती त्या गरिबीतही ते पैसे मंदिरात नेऊन द्यायला सांगते. गरिबीतल्या तिच्या या मूल्यसंस्काराचे भान महत्वाचे आहे. ती स्वत: मुलांना आदर्श तिच्या समर्पणातून घालून देते.
मला स्वत:ला गुरुजींची आई एक शिक्षिका म्हणून खूप भावते. कुटुंबव्यवस्थेत ठरवले तर किती प्रकारचे अनुभव दिले जाऊ शकतात? छोट्या छोट्या प्रसंगातून ती जाणिवा विकसित करते. यासाठी मला ती भावते. ती पर्यावरण, जातीयताविरोध, गरिबांविषयी कणव, समर्पण हे सारं सारं शिकवते. श्यामने मुक्या कळ्या खुडल्यावर किंवा झाडाची जास्त पाने तोडली तरी ती आई त्याला पर्यावरणाची, झाडाच्या भावनांची जाणीव करून देते. आपला मुलगा भित्रा बनू नये म्हणून ती सक्तीने त्याला पोहायला पाठवते. दलित म्हातारी मोळी उचलू शकत नाही म्हणून त्या बुरसटलेल्या काळात श्यामला दलित म्हातारीला स्पर्श करायला लावते. या सर्व गोष्टीतून ती जे संस्कार त्याच्यावर करते ते त्या काळाच्या कितीतरी पुढचे आहेत.
सोप्या सोप्या प्रसंगातून ती जे तत्वज्ञान सांगते ते किती विलक्षण आहे. श्याम डोक्यावरचे केस वाढवतो. वडील रागावतात.तेव्हा श्याम वैतागून म्हणतो, *“आई केसात कसला गं आलाय धर्म"* तेव्हा ती म्हणते, *"तुला केस राखायचा मोह झाला ना. मोह टाळणे म्हणजे धर्म!"* इतकी सोपी धर्माची व्याख्या क्वचितच कोणी सांगितली असेल. किंवा लाडघरच्या समुद्रात ती समुद्राला पैसे वाहते. तेव्हा श्याम म्हणतो की *ज्याच्या पोटात रत्न आहेत त्याला पैसे कशाला?* तेव्हा ती म्हणते की *सूर्याला ही आपण काडवातींनी ओवाळतोच ना? प्रश्न त्या कृतज्ञतेचा आहे.*
मला तिचे मुलाला केवळ उपदेश न करता ती हे संवादी राहणे विलक्षण हलवून टाकते. मूल जे विचारील त्याला ती प्रतिसाद देते आणि तिच्या समजुतीनुसार ती समजून सांगत राहते. आजच्या नव्या पिढीच्या मातांसाठी श्यामची आई मला म्हणूनच महत्वाची वाटते. आज एकतर मुलांशी बोललेच जात नाही व जे बोलले जाते ते मुलाच्या करियर च्या भाषेत आणि मुलाला त्याचे दोष सतत सांगत. पण श्यामने इतक्या गंभीर चुका करून ही ती सतत करुणेने ओथंबली आहे. आज हा संवाद आणि मुलांशी त्याच्या पातळीवर जाऊन व्यक्त करणेच कमी झाले आहे. असलाच तर *‘श्यामच्या आई’* चा हा धागा महत्वाचा आहे.
अभावातले आनंद आणि समर्पणातला आनंद ती मुलांना शिकवते. स्वत:ला सणाच्या दिवशी साड्या नसताना स्वत:ला आलेल्या भाऊबीजेतून ती पतीचे फाटके धोतर बघून नवे धोतर आणवते. श्यामला त्यातून एकमेकांसाठी काय करायचे असते याचे भान येते.
*आजच्या पिढीच्या मातांसाठी श्यामच्या आईचे आज औचित्य काय आहे?*
अनेकजण असे म्हणतील की आज काळ बदलला आहे. आजचे प्रश्न वेगळे आहेत. मुले आता काही श्याम इतकी भाबडी राहिली नाहीत. मोबाइल आणि संगणक वापरत ही पिढी खूप पुढे गेली आहे.
हे जरी खरे असले तरी मुलांमधील बालपण जागवायला मुलांना संवेदनशील आणि सामाजिक बनवायला श्यामच्या आईचीच पद्धती वापरावी लागेल.
आज मध्यमवर्ग /उच्च मध्यमवर्गात मुलांवर सुखाचा मारा होतो. त्यातून त्याच्या संवेदना तरल राहत नाहीत. जीवनात आनंद, यश विकसित करावे लागतात, रेडीमेड मिळत नाहीत याची जाणीव मुलांना असणे आवश्यक आहे. अभाव वाट्याला न आल्याने गरीबी वंचितता याची वेदना कळत नाही आणि अभावातूनही पुढे कसे जायचे हे उमगत नाही किंवा आजूबाजूचे जग हे ही सुखवस्तू असल्याने या गरीबांच्या जगण्याचा परिघच परिचित होत नाही. पुन्हा वाचन, संगीत, निसर्ग असे अनुभव बहुतेक घरात न दिल्याने मुले टीव्ही, मोबाइल, कार्टून, दंगामस्ती असले स्वस्त आनंदाचे मार्ग शोधतात व त्यातून त्यांची विचारशक्ती व संवेदनाच विकसित होत नाही.
आपली मुले एकमेकात ज्या गप्पा मारत वेगाने आत्मकेंद्रित होत आहेत. ते भयावह आहे. समाजातील वंचितांविषयीची वेदना त्यांना हलवत नाही. सामाजिक किंवा कौटुंबिक उत्सवाचे, यशाचे, आनंदाचे प्रसंगही त्यांना आपले वाटेनासे होताहेत. डिस्कवरी वृत्तवाहिनीवर वाघ हरणाचा पाठलाग करीत असतो. हरिण जिवाच्या आकांताने पळत असते. ज्या क्षणी वाघ हरिणावर झेप घेते तो क्षण आपल्याला बघवत नाही आपण चॅनल बदलतो. पण आपली मुले रिमोट हिसकवून घेत ते दृश्य बघतात. हे बघून भयचकित व्हायला होते. हीच मुले अपघात आणि खून ही असेच चवी चवीने लाईव्ह बघतील. मुलांचे हे कोलमडणारे भावविश्व ही मला चिंता वाटते आणि हीच मुले उद्या अधिकारी होणार आहेत. निर्णयप्रक्रियेत सहभागी असणार आहेत. त्यांना गरिबांचे, पर्यावरणाचे प्रश्न तरी कळतील का?
पुन्हा या सर्वातून मुलांचा अहंकार चुकीच्या पद्धतीने विकसित होतो आहे. थोडे बोलले तरी मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत.
पालकांची स्वयंव्यग्रता ही पुन्हा समस्या बनली आहे. पालक दिवसभर काम आणि घरी आल्यावर टीव्ही फोन आणि सोशल मीडियात रमून गेलेत. याला मुलांच्या आई ही अपवाद नाहीत. यातून मुलांशी संवाद बंद झालेत. घरात वस्तु मिळताहेत पण प्रेम आणि संवाद मिळत नाहीये. यातून मुले प्रेम दुसरीकडून, वस्तूमधून मिळवतात आणि संवाद ही चुकीचा करू लागतात.
*इथेच नेमकी श्यामची आई मला महत्वाची वाटते.* ती मुलाशी सतत बोलत राहते. वैतागून चिड चिड न करता पण कणखरपणे ती त्याला समजावून सांगते. छोट्या छोट्या प्रसंगातून त्याला मूल्य परिचित करून देते. केवळ शब्दाने संस्कार करण्यापेक्षा आपल्या अपरिमित कष्टाने आणि मायेने संस्कार करते. आजच्या सुशिक्षित कुटुंबातील आयांनी श्यामच्या आईकडून हे शिकायला हवे.
******************
*- सौ. अंजली कारेकर*
*🌸शट्डाऊन अॅण्ड रीस्टार्ट🌸*
चांगले - वाईट दिवस सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. पण काही वेळा आपल्या जीवनात काय चालले आहे हे आपल्यालाच कळत नाही. कष्ट करूनही फळ मिळाल्यासारखे वाटत नाही, विचार जुळत नाहीत. परिस्थिती पटत नाही. एकटेपणाची घंटा सतत कानात वाजत राहते. कशातही मन लागत नाही. हाती घेतलेले काम पूर्ण होत नाही. नवीन काम मिळत नाही. जवळच्यांपासून दुरावा जाणवतो. आपल्याला कुणी समजत नसल्याच्या विचाराने मन कटू होते...
अशावेळी निराश होऊन काही परिस्थिती बदलणार नसते. रडूनही सहानुभूती शिवाय काहीच मिळत नाही. जे आपणच समजू शकत नाही किंवा सांगू शकत नाही ते आपले जवळचे तरी कसे समजतील. स्वत:ला किंवा कुणालाही दोष देणे मूर्खपणाच ठरेल. ही परिस्थिती, हा प्रसंग कुणावरही येऊ शकतो. खरे तर प्रत्येकावर कधी ना कधी येतोच. अशा वेळी न रडता, न घाबरता खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे...
मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या बाबतीत आपण जसे करतो ते स्वत:वर करा. कधी कधी मधेच मोबाईल आणि कॉम्प्युटरची बटणे दाबूनही काही होत नाही. तेच चित्र दिसत राहते. आपण काही केल्या यंत्र चालू होत नाही.,
अशा वेळी तुम्ही काय करता...??
फोन आणि संगणक जसे ‘हँग’ होतात तसेच आपल्या मेंदूचेही होते. विचार पांघरूण डोक्यावर ओढून झोपून जातात आणि मेंदू हँग होतो. तेव्हा सारखी बटणं दाबत बसू नका...
‘डोकं का चालत नाही...??’
या मुद्यावर स्वत:चा छळ करू नका. हँग झाल्यावर मोबाईलची बॅटरी काढून त्याला फुंकर मारून परत मोबाईलमध्ये घालून चालू करण्याचा अनुभव सर्वांनाच असेल., तसेच करा...
काही वेळापुरता सर्व विचार बाजूला सारा.
काय होत नाही.??
किंवा का होत नाही..??
यावर वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. स्वत:ची बॅटरी काढा., थोडे मोकळे व्हा., जे आवडते ते करा., मित्रमैत्रिणींना भेटा., छंद पूर्ण करा., जमेल त्यानुसार एक किंवा दोन दिवस मनाची बॅटरी चांगल्या रितीने चार्ज करा...
मन सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवा. जगातल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष घाला. एकटेच दूरपर्यंत चाला. स्वत:शी चांगल्या गप्पा मारा. काम आणि जबाबदार्यांमध्ये अडकल्यामुळे इतर वेळी जे करणे राहून जाते ते करा. यालाच म्हणतात वैचारिक शटडाऊन...
हे सगळे करून बॅटरी नक्कीच चार्ज होईल. मग पुन्हा नव्याने रिस्टार्ट करा. जुने वाद, प्रसंग, दु:ख, त्रास यांच्याकडे नव्याने पहा. विचारांमध्ये नक्कीच फरक पडलेला जाणवेल...
आपले मन म्हणजे एखाद्या मोबाईल सारखे असते. दिवस -रात्र वापर करीत असताना अनेकदा त्याची बॅटरी लो होते. ती वेळोवेळी चार्ज करावी लागतेच. त्याचबरोबर ‘मन’ हँग झाले की पूर्णपणे शटडाऊन करून रिस्टार्टही करावे लागतेच...
मनाची काळजी घ्या.., बॅटरी चार्ज करीत राहा आणि गरज भासली तर *‘शट्डाऊन अॅण्ड रिस्टार्ट.....!!!’*
मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी?
निट वाचा आणि विचार करा
हा-पंधरा वर्षांपूर्वी शहरांपुरते मर्यादित असलेल्या इंग्रजी शाळा पाहता पाहता छोट्या छोट्या गावांतही सुरू झाल्या. इंग्रजी शाळांचे पेव आत्ता खेड्यापाड्यातही पसरले आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम सरकारी मराठी शाळांवर झाला. कारण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना या इंग्रजी शाळांना पळवून नेत आहेत. पालकांची इच्छा नसेल, तरीही त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून, त्यांच्या मुलांना मोफत दप्तर, वह्या, पुस्तके आणि येण्या-जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून पालकांना आकर्षित करण्याचे काम केले जात आहे. याउलट, सरकारी शाळेत शासन सर्व सुविधा अगदी मोफत देत असते. तरीही ग्रामीण भागांतील पालकों इंग्रजी शाळांवरील लक्ष अजूनही कमी झालेले नाही.
'दुरुन डोंगर साजरे' या म्हणीनुसार इंग्रजी शाळा पालकांना आकर्षित करतात. पण त्यांचे आकर्षण फार काळ टिकत नाही. विविध कारणांमुळे एक-दोन वर्षांत ही मुले पुन्हा सरकारी शाळेत प्रवेश घेतात. काही पालकांना या शाळेचा खर्च झेपत नाही. त्यांच्या शाळेचा गणवेष, वह्या आणि इतर खर्च आणि त्याचबरोबर न झेपणारा अभ्यास या सर्व बाबींना कंटाळून पालक आपल्या मुलांना जवळच्या शाळेत घालतात. इंग्रजी शाळेतील अभ्यास मुलांना समजण्यास अवघड जाते. घरात बोलली जाणारी भाषा एक, शाळेत बोलली जाणारी भाषा दुसरीच! त्यामुळे मुले गोंधळून जातात. 'इकडे आड, तिकडे विहीर' अशी मुलांची अवस्था होते.
दोन वर्षे इंग्रजी शाळेत शिकलेली मुले जेव्हा मराठी शाळांत प्रवेश घेतात, तेव्हा ते गोंधळून जातात. पालकांनी आपल्या मुलांची क्षमता लक्षात घेत त्यांना शाळेत प्रवेश घेऊन द्यायला हवा. काही मुले खूप हुशार असतात. काहीही सांगितले, तरीही त्याचा लगेच स्वीकार करतात आणि त्यात प्रगतीही करतात. ज्या प्रकारे हाताची पाचही बोटे सारखी नसतात. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक मूलही वेगळे असते.
'शेजाऱ्यांचा मुलगा ज्या शाळेत जातो, त्याच शाळेत आपलाही मुलगा जावा' असा विचार करणे साफ चुकीचे आहे. जे पालक आपल्या पाल्यांच्या भवितव्याची काळजी करतात, ते विचारपूर्वक पाऊल उचलतात. 'फाडफाड इंग्रजी बोलता आले, की आयुष्यात यश मिळते' हा साफ चुकीचा समज आहे. पण सध्या असा समज प्रत्येक घरात आहे. घरातलं मूल 'रेन रेन, कम अगेन' म्हणालं, की आई-वडिलांची छाती अभिमानाने भरून येते. 'लेकरू इंग्रजी गाणे म्हणत आहे' म्हणून कौतुक करतात. पण खरोखर त्याचा अर्थ त्याला कळतो का? तर उत्तर आहे 'नाही'! त्याच्या शाळेतील 'मिस'ने ज्या हावभावाने ते गीत शिकवलेले असते, त्याच हावभावाने ते मूल गाणे म्हणते. त्याचा अर्थ त्याला माहीत नसतो. याउलट मराठीत, म्हणजे आपल्या मातृभाषेत 'येरे येरे पावसा' म्हणताना त्याला हावभाव पाठ करण्याची गरज नसते. त्या ओळीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत असतो आणि हावभाव करताना ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. असेच काही अनुभव इतर विषयाच्या बाबतींतही घडत असते. त्यामुळे मुलांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून होणे प्रगतीसाठी आवश्यक आहे.
एखाद्या विषयाचा गाभा किंवा मूळ संकल्पना कळाली, तर त्याचा अभ्यास करून कोणत्याही भाषेत व्यक्त होता येते. पण मूळ संकल्पनाच कळाली नाही, तर पोपटपंची करून इतर भाषेत व्यक्त करता येत नाही. मातृभाषेतून शिकल्याने वाचनाची आवड निर्माण होऊन उत्तम ज्ञान, संशोधक वृत्ती व उच्च अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व तयार होते. आकलन शक्तीस भरपूर चालना मिळते. तसेच, स्वयंअध्ययन करण्यास मदत मिळते. सभोवती मराठीचे वातावरण असल्याने पाठांतर करण्याची गरज भासत नाही. तसेच, मराठीत जे बोलले, तसेच लिहिले जाते; पण इंग्रजी बोलणे वेगळे आणि लिहिणे वेगळे असते. त्यामुळेही मुलांना गोंधळून जायला होते. त्यांना शब्दार्थ पाठ केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याचमुळे इंग्रजी शाळेत शिकणारी मुले नेहमी घोकंपट्टी करताना दिसून येतात. कधी कधी काही पाठ झाले नाही, तर वैतागतात, निराश होतात; तर काही मुले व्यसनाधीन होतात.
इंग्रजी शाळेतील बहुतांश शिक्षक प्रशिक्षित व तज्ज्ञ नसतात, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यांना तुटपुंजा पगार असतो. तोही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ते खासगी शिकवणी घेण्याकडे वळतात, त्याचा खर्च वेगळाच! काही इंग्रजी शाळा याला अपवाद असतीलही; पण हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतक्याच..
विस्मृती ही माणसाला मिळालेली एक देणगी आहे. ती चांगलीही आहे आणि वाईटही! चांगली एवढ्यासाठी, की काही दु:खद गोष्टी विसरून गेलो, तर माणूस जिवंत राहू शकतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट स्मृतीत राहिली असती, तर माणूस नक्कीच पागल झाला असता; म्हणून विस्मृती चांगली बाब आहे. मात्र, जे स्मृतीत राहावे म्हणून शालेय जीवनात पाठांतर करतो, ते मात्र काही काळानंतर विसरून जातो, हे आपल्यासाठी हे आपल्यासाठी वाईट आहे. पोपटपंची केलेल्या गोष्टी चिरकाल लक्षात राहत नाही; मात्र समजून घेतलेल्या अनेक गोष्टी कायमस्वरूपी लक्षात राहतात. म्हणून मातृभाषेतील शिक्षण आवश्यक आहे. कारण मातृभाषेतील शिक्षणासाठी पोपटपंची करण्याची गरज राहत नाही. समजून घेऊन अभ्यास करू शकतात. घरातील इतर मंडळीही अभ्यासात मदत करू शकतात, काही चुकले असेल तर मार्गदर्शनही करत असतात. मात्र, इंग्रजी शाळेतील मुलांच्या बाबतीत उलटे घडते. मुलांना शाळा आणि ट्युशन याच गोष्टींवर अवलंबून राहावे लागते. सहसा ग्रामीण भागातील पालकांना इंग्रजी वाचता येत नाही, तर ते मुलांना काय सांगू शकतील? 'तुझ्या शिक्षकांनाच विचार' असे उत्तर त्यांना मुलांना द्यावे लागते. येथूनच मग मुलांचा-पालकांचा संवाद कमी होतो. मुले इंग्रजी खाडखाड बोलतील; पण मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या मुलांसारखे आपले स्वत:चे मनोगत व्यक्त करू शकणार नाही. त्यांना अनेक अडचणी येऊ शकतात. यास शंभरातून एखादा अपवाद असू शकतो.
सध्या सगळीकडे शाळांच्या प्रवेशाचे काम सुरू झाले आहे. एकदा प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, की पालकांना नंतर काहीही करता येत नाही. म्हणून 'आपल्या पाल्याला कोठे प्रवेश द्यावा' याविषयी पालकांचे आताच प्रबोधन होणे आवश्यक आहे. हातातून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांविषयी डोळसपणे विचार करून निर्णय घ्यावे. अन्यथा आपल्या मुलांचे आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' या उक्तीनुसार काम केल्यास आपणास पश्चाताप होणार नाही. पालकांनी मातृभाषेचे महत्त्व प्रथम जाणून घ्यावे; मगच योग्य वाटेल, तिथे मुलांना प्रवेश द्यावा..

तंत्रज्ञान-प्रगतीचे एक पाऊल पुढे ! (अजय लेले)
मंगळ मोहिमेच्या निमित्तानं भारतीय शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना नव्यानं बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. या मोहिमेसाठी विकसित केलेल्या किंवा तयार केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग देशाला नागरी, व्यापारी आणि लष्करी क्षेत्रातही करता येण्यासारखा आहे.
भारतानं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं आखलेल्या पहिल्या मंगळमोहिमेच्या अवकाशयान प्रक्षेपणाचं सर्व जग साक्षीदार ठरलं. या यशस्वी प्रक्षेपणामुळं या मोहिमेचा पहिला टप्पा पार पडला आहे. अवकाशयानाला मंगळाच्या कक्षेत पोचण्यास आणि निरीक्षणं घेण्याची सुरवात करण्यास अद्याप 300 दिवसांचा अवधी असल्यानं ही मोहीम यशस्वी झाली, असं आत्ताच म्हणता येणार नाही. तरीही, हा पहिला अडथळा पार केल्याबद्दल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे देशासाठी एवढं मोठं स्वप्न पाहिल्याबद्दल भारतीय अवकाश संशोधन संस्थेचं (इस्रो) अभिनंदन करायलाच हवं. मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचं परिश्रमयुक्त नियोजन आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी पाहता ही मोहीम यशस्वी होणं, ही फक्त आता वेळेची बाब आहे, याबद्दल भारतीयांच्या मनात शंका नाहीत.
या टप्प्यावर या मंगळमोहिमेचा आणि जो व्यापक दृष्टिकोन ठेवून यासाठी इतका खर्च केला त्याचा भारताला काय उपयोग, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तांत्रिक, वैज्ञानिक आणि भूराजकीय दृष्टिकोनातून या मोहिमेचं मूल्यमापन करता येईल. प्रचंड लांबवरचा प्रवास करणं आणि नंतर मंगळाच्या कक्षेत स्थिरावणं, हे मोठं तांत्रिक आव्हान आहे. तब्बल 300 दिवस अवकाशयानाला अनपेक्षित किरणोत्सर्गाच्या आव्हानाला तोंड देत मार्गक्रमण करायचं आहे. शिवाय, मंगळाच्या कक्षेत पोचल्यावर योग्य पद्धतीनं कार्यरत व्हायचं आहे. अवकाशयानाच्या स्थितीकडं काळजीपूर्वक लक्ष देणं आणि त्याच्या कायम संपर्कात राहणं, हे पृथ्वीवरच्या नियंत्रण कक्षालाही आव्हानच आहे. अवकाशयान मंगळाच्या कक्षेत स्थिरावल्यावर पृथ्वीवरून यानाकडं आणि तिथून पुन्हा पृथ्वीकडं संदेश येण्यास 40 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. या मर्यादेवर उत्तर म्हणून अवकाशयान स्वत:च निर्णय घेऊ शकेल, अशी त्याची रचना करण्यात आली आहे.

या मोहिमेच्या निमित्तानं भारतीय शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना खूप तंत्रज्ञान शिकता आलं. या मोहिमेसाठी वेगवेगळ्या प्रकारे विकसित केलेल्या किंवा तयार केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग देशाला नागरी, व्यापारी आणि लष्करी क्षेत्रातही करता येण्यासारखा आहे, हे कौतुकास्पद आहे. प्रवासादरम्यान आणि मंगळाच्या कक्षेत पोचल्यावर अत्युच्च तापमान, गुरुत्वाकर्षणात सातत्यानं होणारा बदल, किरणोत्सर्ग आणि सौरमालेतल्या इतर घटनांच्या आव्हानासमोर टिकण्याकरिता अवकाशयान तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीच्या निर्मितीसाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. याशिवाय संपर्कयंत्रणा, मोबाईल प्लॅटफॉर्मवरून संपर्कयंत्रणेचं व्यवस्थापन (यासाठी पॅसिफिक महासागरात दोन जहाजं तैनात करण्यात आली आहेत), कृत्रिम बुद्धिमत्ता (स्वत:चे निर्णय घेण्याची अवकाशयानाची क्षमता), रोबोटिक्स आणि इतर काही तंत्रज्ञानाचा विकास यानिमित्तानं करण्यात आला आहे. या सर्व तंत्रज्ञानाचा इतर क्षेत्रांतही उपयोग करता येण्यासारखा आहे.
मंगळाच्या पृष्ठभागाची आणि ग्रहाभोवतीच्या वातावरणाची जास्तीत जास्त माहिती गोळा करणं, हा या मोहिमेमागचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उद्दिष्ट आहे. मंगळावर मिथेन वायूचं अस्तित्व आहे की नाही, हे ओळखण्यासाठी अवकाशयानामध्ये विशिष्ट सेन्सर यंत्रणा बसवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारावरच मंगळावरच्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाबाबत निश्चित काही सांगता येणार आहे. या सेन्सरद्वारे मिळणाऱ्या माहितीबाबत जगातल्या सर्व शास्त्रज्ञांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. नॅनो टेक्नॉलॉजी, ऑप्टिकल टेक्नॉलॉजी आणि थर्मल टेक्नॉलॉजी यांच्यासह विविध सेन्सर विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सेन्सर विकसित करण्याच्या या प्रक्रियेदरम्यान काही अतिरिक्त विविध सेन्सरचीही निर्मिती झाली आहे. या सर्व प्रक्रियेमुळं सध्या असलेल्या तंत्रज्ञानाबद्दलच्या ज्ञानात मोलाची भर पडणार आहे.
या मोहिमेचं भूराजकीय महत्त्व उघड झालेलं नाही; तरीही ही मोहीम यशस्वी होणं, हाच भारताच्या उच्च तांत्रिक क्षमतेचा पुरावा ठरणार आहे. 1970 पासून 2010 पर्यंत अणुधोरणामुळं भारताच्या तंत्रज्ञान-आयातीवर निर्बंध लादण्यात आले होते आणि त्यामुळं तंत्रज्ञानाबद्दलच्या बहिष्काराला ज्या भारताला सामोरं जावं लागलं होतं; त्याच भारतानं ही तांत्रिकक्षमता स्वत:च प्राप्त केली, ही बाब अभिमानास्पद आहे. भारताचा अवकाश कार्यक्रम हा जगातल्या कमी खर्चिक अवकाश कार्यक्रमांपैकी एक आहे. वास्तवात तुलना केल्यास, मुंबईतल्या मलबार हिल परिसरातल्या एका आलिशान बंगल्याच्या किमतीएवढाच खर्च या मोहिमेला लागला आहे!
"मंगळमोहीम' म्हणजे "रात्री झोपेत सोन्याचा साठा दिसला आणि पडझड झालेल्या किल्ल्यात खजिन्याचा शोध सुरू झाला,' असा प्रकार नाही. आपल्या शेजारच्या ग्रहावर काय आहे, हे अधिक प्रमाणात जाणून घेण्याची ही एक आस आहे. मंगळावरचं "वातावरण' नाहीसं का झालं आणि कधीकाळी किंवा सध्याही तिथं जीवसृष्टी असेल तर तिचं काय, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीचा प्रयत्न म्हणून ही मोहीम आहे. भविष्यात मंगळावर वसाहत शक्य आहे काय, हेही पडताळून पाहायचं आहे. पृथ्वीची अवस्था सध्याच्या मंगळासारखी होण्याची शक्यताही तपासायची आहे. या मोहिमेचं प्रत्येक उद्दिष्ट भविष्यात होऊ शकणाऱ्या फायद्याशीच निगडित आहे. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यास आत्तापासूनच सुरवात केली नाही, तर पृथ्वीवरच्या जीवसृष्टीच्या भल्यासाठी आपल्या या मोहिमेच्या अनुभवातून शिकणं अवघड होईल; त्यामुळं आत्ताच सुरवात करणं आवश्यक आहे. कारण, आपण पुढच्या पिढ्यांचंही काही देणं लागतो!
(लेखक दिल्लीस्थित संरक्षण विश्लेषक व "मिशन मार्स : इंडियाज् क्वेस्ट फॉर रेड प्लॅनेट' या पुस्तकाचे लेखक आहेत.)
No comments:
Post a Comment