अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम
साठी उपक्रम =१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.
३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम
१)धुळपाटीवर लेखन
२)हवेत अक्षर गिरविणे.
३)समान अक्षर जोड्या लावणे.
४)अक्षर आगगाडी बनवणे.
५)पाहुणा अक्षर ओळखणे.
६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
७)बाराखडीवाचन करणे.
८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
११)कथालेखन करणे.
१२)कवितालेखन करणे.
१३)चिठठीलेखन करणे.
१४)संवादलेखन करणे.
१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.
गणित
१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे
२)वर्गातील वस्तु मोजणे
३)अवयव मोजणे
४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे
५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
६)आगगाडी तयार करणे
७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.
८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.
९)अंकाची गोष्ट सांगणे.
१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.
११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे
१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.
१३)बेरीजगाडी तयार करणे.
१४)अंकांपुढे वस्तु मांडणे
१५)गठ्ठे सुट्टे सांगणे
१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.
*वाचन पाटी च्या साहाय्याने विविध उपक्रम*
✅(०१)गोट्या(विविध रंगी कंच्या) च्या साहाय्याने संख्या वाचन करणे.
✅(०२) दोन गोट्यांच्या साहाय्याने एक अंकी, दोन अंकी, .........बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार क्रिया करणे.
✅(०३) दोन गोट्यांच्या साहाय्याने लहान-मोठी संख्या ठरविणे.
✅(०४) गोट्यांच्या साहाय्याने कप्प्यातील सर्वात लहान, सर्वात मोठी संख्या सांगणे.
✅(०५) तीन/चार/पाच गोट्या टाकून कप्प्यातील संख्यांचा चढता क्रम, उतरता क्रम ठरविणे.
✅(०६) गोट्याच्या साहाय्याने कप्प्यातील संख्यांचे वाचन व लेखन करणे.
✅(०७) गोट्यांच्या साहाय्याने कप्प्यातील सम-विषम संख्या ओळखून सांगणे.
*संख्या वाचन पाटीवरून असे बरेचसे गणिती उपक्रम हसत-खेळत घेता येतात.
मिञांनो सदरील साहित्यापासून आपल्याला गणित, मराठी व इंग्रजी विषयासाठीचे उपक्रम घेता येतात. मराठी विषयासाठीचे इयत्ता १ ली साठी अक्षरबोध होण्यासाठी प्रत्येक घरात(कप्प्यात) विविध अक्षरे ठेवून एक गोटी सोडण्यास सांगावी, गोटी ज्या घरात जाइल त्या घरातील अक्षराचे वाचन व लेखन करूण घ्यावे. याप्रमाणे प्रत्येक घरातील अक्षरांचे वाचन होईल. तसेच घरात विविध शब्द ठेवून एक गोटी सोडून ज्या घरात गोटी जाइल त्या घरातील शब्द मुलांकडून वाचून व लिहून घ्यावा.एक एक याप्रमाणे प्रत्येक घरातील अक्षरे, शब्दांचे वाचन व लेखन करता येईल. तसेच इंग्रजी विषयांसाठीची अक्षरे, शब्दांचे वाचन लेखन करता येईल.
गणित विषयासाठी गोट्यांच्या साहाय्याने संख्यांचे वाचन करताना ९/१० गोट्या एकदाच सलग सोडायच्या, गोट्या ज्या ज्या घरात जाइल त्या त्या प्रमाणे संख्यांचे वाचन करता येते.(जसे- एककाच्या घरात ४ गोट्या, दशकाच्या घरात २गोट्या, शतकाच्या घरात ७गोट्या व हजार स्थानच्या घरात ८गोट्या गेल्या तर ८७२४ ही संख्या तयार होईल.) बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार क्रिया करताना प्रत्येक घरात विविध संख्या ठेवा किंवा संख्यांऐवजी ३०/४० गोट्या एकदाच सलग सोडा ज्या घरात जेवढ्या गोट्या जाईल तेवढी संख्या वहीवर तयार करा, आता दोन रंगीत किंवा मोठी गोटी एक एक याप्रमाणे सोडा ती ज्या घरात जाइल त्या घरातील संख्या घेऊण बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार क्रिया करता येईल. (सुरूवातीला एक गोटी सोडायची, ती गोटी ज्या घरात जाईल ती संख्या घ्यायची व नंतर दुसरी गोटी सोडायची ती ज्या घरात जाईल ती संख्या घ्यायची)
याप्रमाणे आपल्याला गोट्यांच्या साहाय्याने लहान-मोठी संख्या, सर्वात लहान-सर्वात मोठी संख्या, संख्यांचा चढता क्रम-उतरता क्रम, सम संख्या-विषम संख्या, संख्यावरून अपूर्णांक असे बरेचसे उपक्रम घेता येतात.
हे शैक्षणिक साहित्य प्लायवूड, ड्रावींग पेपर, फेवीकोल , अर्धा इंची खिळे इत्यादिच्या साहाय्याने तयार केले. खर्च फक्त १०₹.
*मिञांनो वर्गाच्या काठिण्य पातळीनुसार या शैक्षणिक साहित्यातील घरांची(कप्प्यांची) लांबी/संख्या वाढवता येते.
No comments:
Post a Comment