⇛ शिक्षकांची कर्तव्ये ⇛
1.शिक्षकांची भूमिका कशी असावी ?
१. विचार आणि विवेक हे दोन्ही दृष्टीकोन असलेला
माणूसचअध्यात्माचे शिखर गाठू शकणे
'विचार आणि विवेक ही प्रगतीची कारणे आहेत', अशी शिकवण आपण त्यांना दिली
पाहिजे. त्यांच्यामध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण व्हावयास हवी. कोणत्याही
प्रश्नांविषयी आपण वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगायला हवा आणि या वैज्ञानिक
दृष्टीकोनाची मानवतावादी दृष्टीकोनाशी सांगड घालता यायला हवी. हे दोन्हीही
दृष्टीकोन असलेला माणूसच आध्यात्मिक वाटचाल करून अध्यात्मज्ञानाचे शिखर
गाठू शकतो.हे विज्ञान शिक्षकाचेच कार्य नाही, तर सर्वच शिक्षकांचे कार्य आहे. मुलांमध्ये या दोन्ही प्रेरणा आपण ज्या वेळी निर्माण करू शकू, त्या वेळी आपल्या राष्ट्राचा महान आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा समजून घेण्याची पात्रता त्यांच्यात निर्माण होईल. लोकांच्या जीवनात ते चैतन्य आणि आनंद निर्माण करू शकतील. उपनिषदांतील उत्तुंग तत्त्वज्ञानाचे त्यांना आकलन होईल. जीवनाकडे पहाण्याचा ऋषीमुनींचा आध्यात्मिक दृष्टीकोन ते जाणून घेऊ शकतील.
२. राष्ट्राची खरी संपत्ती म्हणजे देशात
मानवी ऊर्जेचे स्रोत निर्माण होणे
तर्कसंगत प्रश्न् विचारण्यावर वेदांताने नेहमीच भर दिला आहे; म्हणून
अशी चिकित्सक, वैज्ञानिक आणि सत्यशोधक वृत्ती मुलांमध्ये वाढीस लागेल, यावर
आपल्या शिक्षणपद्धतीत जोर द्यायला हवा. 'सत्य काय ? सत्य जीवन कसे असते ?
आणि मिथ्या गोष्टी सोडून सत्य गोष्टी आपल्या जीवनात कशा आणता येतील ?, अशा
प्रकारची शोधक अन् जिज्ञासू वृत्ती आपल्या मुलांमधील अनेक सुप्त शक्तींना
चेतवू शकेल, अशा रीतीने आपल्या मुलांच्या वृत्तीत पालट होऊ शकला, तर
राष्ट्राची खरी संपत्ती, म्हणजे मानवी ऊर्जेचे स्रोत आपल्या देशात निर्माण
होतील. यालाच मानव संसाधनविकास म्हणता येईल. यामुळे आपले राष्ट्र अधिक महान
बनेल.३. शिक्षणाचा आत्मा
मनुष्यातील ऊर्जा स्रोत संवर्धित करायचा आणि त्या स्रोताला मानवतावादी दिशा द्यायची, हे सारे शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांत यायला हवे.४. विद्यार्थ्यांविषयी पुढील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक !
अ.विद्यार्थी पाठ्यपुस्तकांतच घोटाळणार नाहीत, इकडे लक्ष द्या.
आ.त्यांना ग्रंथालयात जाणे आणि अधिकाधिक ज्ञानकण ग्रहण करणे, यांसाठी प्रेरित करा.इ.त्यांना अधिक आणि नेमके ज्ञान मिळेल, इकडे लक्ष द्या.
ई.विद्यार्थ्यांनी ग्रंथ वाचल्यावर त्यांना त्यावर विचार करायला शिकवा.
उ.आपले शिक्षक आणि अन्य विद्यार्थी यांच्यासह चर्चा करायला त्यांना प्रेरित करा.
ऊ.शिक्षक हा केवळ शिकवत नसतो, तर विद्यार्थ्यांत स्वतंत्रपणे ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता निर्माण करत असतो.
५. देशाच्या इतिहासातील आरंभीची ३००० वर्षे एकत्रितपणे महान संस्कृती
निर्माण करणारे आपल्या देशातील विद्यार्थी आणि शिक्षक विद्यार्थी या
संस्कृत शब्दाची फोड विद्या आणि अर्थिन् अशी आहे. ज्ञान आणि ते मिळवणारा,
असा त्याचा अर्थ आहे. असे विद्यार्थी अन् शिक्षक भारतात होते. त्यांनी
आपल्या देशाच्या इतिहासातील आरंभीची ३००० वर्षे एकत्रितपणे एक महान
संस्कृती निर्माण केली. त्यानंतर एक सहस्र वषार्र्ंच्या काळात एकप्रकारचा
साचलेपणा आल्यामुळे सर्व ज्ञानप्रवाह कुंठित झाले. या अवस्थेतून आता आपण
आपली सुटका करून घेण्यास आरंभ करायचा आहे.
६. शिक्षकीपेशा हे सतीचे वाण आहे; म्हणून शिक्षकांनी
जे अन्य क्षेत्रांत अपयशी होतात, त्यांनी शेवटी शिक्षकी पेशा
स्वीकारावा, असे आपल्या शिक्षकांच्या संबंधी घडू नये. उत्कृष्ट बुद्धीच्या
लोकांना शिक्षकी पेशाचे आकर्षण वाटावयास हवे. एकदा या क्षेत्रात आल्यावर
त्या व्यक्तीला आपण स्वतः आणि आपला पेशा यांविषयी आत्मविश्वास आणि आत्मीयता
वाटावयास हवी. शासनानेसुद्धा 'उत्कृष्ट दर्जाचे लोक शिक्षकी पेशाकडे कसे
वळतील', हे पाहिले पाहिजे. 'बदमाशांसाठी देशभक्ती हेच अखेरचे आश्रयस्थान
आहे' (पॅट्रिऑटिझम् इज दि लास्ट रेफयूज ऑफ द स्काउंड्रल'), असे
इंग्लंडमध्ये १८ व्या शतकात म्हटले जात होते. त्याच धर्तीवर समाजात
'सर्वतोपरी अपयशी ठरलेली व्यक्तीच शिक्षणक्षेत्रात येते', हा समज आता
भारतात खोटा ठरावा. शिक्षकीपेशा हे एक सतीचे वाण आहे. शिक्षकांनी
ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार याला वाहून घ्यावयास हवे.
६. शिक्षकीपेशा हे सतीचे वाण आहे; म्हणून शिक्षकांनी
ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार याला वाहून घेणे आवश्यक !
2.शिक्षकांचे दायित्व !
शिक्षकांकडून त्यांच्या धर्माचे पालन होत नसल्याने
शाळेतून सद्गुणी म्हणून बाहेर पडलेला विद्यार्थी नंतर भ्रष्टाचार करू लागणे !
खरे पहाता शिक्षकाचा धर्म आहे, विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांची वृद्धी
करून त्यांची जोपासना करणे. कारण एखादा विद्यार्थी शाळेतून सद्गुणी म्हणून
बाहेर पडल्यावर त्याचा समाजाला लाभ होईल. समाज आणि राष्ट्र यांना खर्या
अर्थाने सक्षम आणि गुणांनी युक्त, परिपूर्ण असा नागरिक देणे, हा शिक्षकाचा
धर्म आहे. जर आपण चिंतन केले, तर आपल्याकडून सद्गुणी नागरिक घडवले जात
नाहीत, हे लक्षात येईल. याचा अर्थ आपण धर्माचे पालन करत नाही. शिक्षक
म्हणतात, मुलांना चांगले गुण मिळाले की, आमचे कर्तव्य संपले. पण यामुळे
त्यांचे कर्तव्य संपत नाही. गुणांमुळे मुलांना नोकरी आणि पैसा मिळेल; पण ते
प्रेमाने, प्रामाणिकपणे आणिनीतीमत्तेने समाजाची सेवा करतील, याची शाश्वती
नाही; म्हणून आज आपल्याला प्रत्येक कार्यालयात भ्रष्टाचारी अधिकारी पहायला
मिळतात. ते निर्लज्जपणे भ्रष्टाचार करतात. आपण समोरच्या व्यक्तीला त्रास
देत आहोत, असे त्यांना अजिबात वाटत नाही.शिक्षकांनी समाजाला सेवक दिल्यासच त्यांच्या धर्माचे पालन होणार असणे !
या स्थितीतून बाहेर पडायचे असेल, तर वाल्याचा जसा वाल्मिकी ऋषी झाला, तसेच अगदी अवखळ आणि दुर्गुणी मूलसुद्धा देवाच्या नामस्मरणाने बदलू शकते, ही ठाम श्रद्धा आपण विकसित करून संस्कारवर्गाच्या माध्यमातून खर्या अर्थाने आपण राष्ट्रकार्य करू, हाच शिक्षकाचा खरा धर्म आणि कर्तव्य आहे. आज आपण समाजाला खरे सेवक द्यायला हवेत. मग ते वैद्य, अभियंता किंवा सरकारी अधिकारी असतील. सर्वच स्तरांवर समाजाला सेवक दिल्यासच आपण आपल्या धर्माचे खरे पालन केले, असे होईल. सर्वांभू्ती एकच परमेश्वर नांदतो, ही भावना सर्वांनी दृढ करणे, हाच खरा शिक्षकाचा धर्म आहे. आपण आपल्या धर्माचे पालन केले नाही, तर व्यक्तीचा, पर्यायाने समाज आणि राष्ट्र यांचा, म्हणजेच आपला विनाश आपणच ओढवून घेणार आहोत.3. अध्यापन ही साधना !
शिक्षणाचे ध्येय आणि शिक्षणाने साध्य
करावयाच्या गोष्टी विसरलेली सध्याची शिक्षणपद्धत
शिक्षणाचे ध्येय :
१. ‘विद्यार्जन करणे हा शिक्षणाचा मुख्य हेतू
२. ‘सा विद्या या विमुक्तये’ : आपली दुःखे नाहीशी करून आपणालासतत आनंद कसा मिळेल, याचे ज्ञान ज्याने मिळते ती विद्या.
शिक्षणाने साध्य करावयाच्या गोष्टी :
शिक्षणाने साध्य करावयाच्या गोष्टी :
१. ज्ञानसंवर्धन आणि बुद्धीमत्तेचा विकास
२. आपल्या शिकवण्यातील कसब आणि नैपुण्य
३. जीवनातील नैतिक मूल्यांचे संगोपन आणि संवर्धन
४. चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्त्व घडवणे
५. आपला सांस्कृतिक वारसा सुधारणे आणि तो पुढच्या पिढीस देणे
६. आपल्या जीवनाचे ध्येय काय असावे, ते साध्य कसे करावे, याचे मार्गदर्शन करणे
७. विध्यार्थ्यांची आदर्श नागरिक म्हणून जडणघडण करणे
सध्याची शिक्षणपद्धती
हुशार विद्यार्थी चांगले गुण मिळवून
आधुनिक वैद्य, अभियंता किंवा मोठे अधिकारी होणे; पणते सुखी, समाधानी
होतीलच, याची निश्चिती नसणे : सध्याच्या शिक्षणपद्धतीत
मुलाला जास्तीतजास्त गुणमिळवून त्याला आधुनिक वैद्य, अभियंता किंवा इतर
चांगल्या व्यवसायात कसा प्रवेश मिळेल, इकडेच पालकांचे,तसेच विध्यार्थ्यांचे
लक्ष असते. समाजसुद्धा शिक्षणसंस्थांचा निकाल किती प्रतिशत लागला, केवळ
याच निकषावरती चांगली कि वाईट ठरवत असतो. हे गुण मिळवण्यासाठी शिक्षक
विध्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव,अधिक घंटे घेणे, टाचण
(नोट्स) देणे, यांद्वारे मार्गदर्शन करत असतात. हुशार विद्यार्थी भरपूर अभ्यास केल्यानेचांगले गुण मिळवून आधुनिक वैद्य, अभियंता किंवा मोठे अधिकारी होतीलही; पण ते सुखी, समाधानी होतीलच,याची निश्चिती नसते.
प्रत्येक कृती ही धर्माने घालून दिलेल्या नियमांत बसवूनच करणे, असे भारतीय संस्कृती सांगतअसणे : पूर्वी
विध्यार्थ्याला मुंज झाल्यावर गुरुगृही धर्माचे शिक्षण दिले जात असे.
त्याच्या आयुष्याचे ध्येय म्हणजेधर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार आहेत, हे
त्याच्या मनावर ठसवत असत. प्रत्येक कृती ही धर्माने घालूनदिलेल्या नियमांत
बसवूनच करावी, असे भारतीय संस्कृती सांगते.
अध्यापन ही साधना म्हणून करण्यास
प्रारंभ केल्यानंतर शिक्षकांनी लक्षात ठेवावयाची सूत्रे
आपला आदर्श विध्यार्थ्यांसमोर ठेवणे :
केवळ उपदेश न करता स्वतःचे आचरण आणि विचार कसेअसायला हवे, याचा अभ्यास
शिक्षकाने करायला हवा; कारण समोर बसलेला विद्यार्थी हा शिक्षकाकडून
त्याच्याप्रत्येक कृतीचे अनुकरण करत असतो. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न
करत असतो. त्यामुळे शिक्षकाची प्रत्येक कृतीही आदर्श असली पाहिजे.
शिक्षकाने स्वतःच्या कृतीतून विध्यार्थ्यांना घडवणे :
उपदेश कितीही चांगला असला, तरीही त्यालाआव्हान हे मिळणारच; परंतु चांगल्या
कृतीला मात्र कोणी आव्हान देऊ शकत नाही. म्हणूनच शिक्षकाने आपल्याकृतीतून
विध्यार्थ्यांना घडवावे, उदा. वर्गात इतर शिक्षक, अधिकारी किंवा पाहुणे आले
की, विध्यार्थ्यांना नमस्कारकरायला
शिकवतात. त्या वेळी ते स्वतः नमस्कार करत नाहीत. त्या वेळी शिक्षकाने तशी
कृती केली, तरविध्यार्थ्यांवर त्याचा प्रभाव जास्त लवकर पडतो.
मुलांना अवांतर वाचन करण्यास सांगतांना शिक्षकांनी एखाद्या पुस्तकातील सूत्रे सांगितली, तर मुलांना अवांतरवाचनाची गोडी लागते.
शिकविण्याच्या दोन पद्धती
तात्त्विक अंग : पुस्तकातले
घटक वाचून खडू, फळा यांच्या साहाय्याने तोंडी समजावून सांगणे किंवाएखादे
शैक्षणिक साहित्य सिद्ध करून त्याद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे.
यात पहिल्याच सूत्राचाअधिकाधिक वापर होतो.
प्रायोगिक अंग : प्रत्येक घटक हा तोंडी सांगतांना विध्यार्थ्यांना कृतीतून शिकवला, तर तो अधिक चांगल्यापद्धतीने समजतो.
संस्कारक्षम गोष्टी सांगून त्यातून काय बोध घ्यायचा, हे सांगणे
प्रत्येक घटकाचे आध्यात्मिकरणशिक्षकाने करावे. म्हणजे त्यातून ज्ञानासह संस्कार करणेही शक्य होईल. मनोरंजनातून संस्कार,
ज्ञान या गोष्टी शिक्षकएकाच वेळी साध्य करू शकतो, उदा. मोठ्या वर्गात आहार
हा पाठ्यपुस्तकातील घटक शिकवतांना चौरस आहारआणि सकस आहार या संकल्पनेचे
आध्यात्मिकरण करतांना सात्त्विक आहार आणि तामसिक आहार यांमुळेविचारांवर
होणारा परिणाम इत्यादी गोष्टी शिक्षक सांगू शकतात.
संस्कारक्षम वय
वय जितके लहान, तितका संस्कार अधिक
रुजतो. सद्गुणांची उपासना ही बाल्यावस्थेतचशक्य होते. विचार आणि कृती
चांगल्या होण्यासाठी संस्कारांची आवश्यकता असते. शालेय वय हे
संस्कारांसाठीयोग्य असते, हे लक्षात घेऊन शिक्षकाने आपले कार्य करावे. असे
केल्याने शिक्षक समाजऋण फेडू शकतो. शिक्षकाने कर्तव्यबुद्धीने हे कर्म
आचरले, तर अध्यापन ही साधना होईल. अन्नदान, सुवर्णदान यांपेक्षा विद्यादान
हेसर्वश्रेष्ठ आहे.
छंदाची जोपासना
छंद म्हणजे एखादी गोष्ट अर्थार्जनाच्या
हेतूने न जोपासता केवळ मौज म्हणून, आवडम्हणून मोकळ्या वेळेत करता
येण्यासारख्या कृती. यामुळे मुले रिकामी न बसता सतत कोणत्या ना कोणत्या
कामातगुंतली जातात. त्यामुळे आयुष्य आनंददायी आणि मन सतत प्रसन्न रहाते.
विध्यार्थ्यांचा कल पाहून छंद जोपासण्यासप्रोत्साहन द्यावे. हे सर्व
करण्यासाठी शिक्षकाला तपश्चर्या म्हणजे साधना करावी लागेल.’
4. सध्याची शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे कर्तव्य
‘सध्याच्या काळात विध्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी शिक्षकांची
भूमिका महत्त्वाची आहे. त्यातून शिक्षक जर साधना करणारा असेल, तर त्याला
हे सहज शक्य होते. मात्र काळानुरूप ही शिक्षणव्यवस्था भारतीय संस्कृतीतून
नष्ट होत गेली. सध्याची शिक्षणपद्धत
ही पाश्चात्यांच्या विचारांवर आधारलेली आहे. हे लक्षात घेऊन ‘सध्याची
शिक्षणपद्धती आणि शिक्षकाचे कर्तव्य’ यात होत गेलेले पालट एका शिक्षिकेने
लिहिलेल्या लेखाद्वारे पुढे देत आहे.
आश्रमातील सात्त्विकतेचा लाभ विद्यार्थी आणि आचार्य या दोघांनाही होणे
पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत अस्तित्वात होती. त्यामध्ये विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उत्तरदायित्वही आचार्यांवर होते. विद्यार्थी गुरुगृही राहून शिक्षण घेत असत. ‘आचार्य देवो भव’ अशीच प्रतिमा विध्यार्थ्यांच्या मनात सिद्ध होत होती. त्यामुळे आचार्य हे स्वतः साधना करणारे असल्याने विध्यार्थ्यांवरही तसेच संस्कार होत असत. त्याशिवाय आश्रमातील सात्त्विकतेचा लाभ विद्यार्थी आणि आचार्य या दोघांनाही होत असे.
शालेय पद्धतीत होत गेलेले पालट
शाळेत
मुलांवर चांगले संस्कार होतील, याची शाश्वती पालकांना असणे : प्रारंभीच्या
काळातशाळेत शिकवणार्या शिक्षकांच्या साध्या रहाणीमानाचा आणि विचारांचा
आदर्श विध्यार्थ्यांसमोर होता. त्यांचे सात्त्विक आचार, विचार
विध्यार्थ्यांना अनुकरण करण्यास योग्य होते. त्यामुळे शाळेत गेल्यावर
आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतील, याची शाश्वती पालकांना होती.
‘संस्कार, धर्माचरण’ हे शब्दच समाजामधून लोप पावत चालल्याने समाजाचे मोठ्या प्रमाणात अधःपतन हाणे : जसजसा
शिक्षणामध्ये पाश्चात्यांचा प्रभाव पडत गेला, तसतसा शाळेतील
शिक्षकांमध्येही पालट होत गेला. पुढच्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळा
आल्या. त्यामुळे शिक्षकांना ‘सर, मॅडम’ म्हणवून घेण्यातच धन्यता वाटू
लागली. त्याचप्रमाणे विध्यार्थ्यांमध्येही
अशाच प्रकारचे संस्कार होतांना दिसत आहेत. ‘संस्कार, धर्माचरण’ हे शब्दच
समाजामधून लोप पावत चालल्याने समाजाचे मोठ्या प्रमाणात अधःपतन होतांना
दिसते.
इतर धर्मीय विध्यार्थ्यांची शालेय स्थिती
इतर धर्मीय विध्यार्थ्यांना शालेय
शिक्षणासह त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्थाही केली जाते. मात्र
हिंदु समाजाला अशा प्रकारचे धर्मशिक्षण दिले जात नाही.
सामाजिक स्थिती
या धावपळीच्या युगात अशी संस्कारक्षम पिढी निर्माण न होण्याची अनेक करणे आहेत. आई-वडिलांना
चाकरीमुळे मुलांकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही. विभक्त कुटूंबपद्धतीमुळे घरात
संस्कार करणारे आजी-आजोबाच नाहीत. त्यामुळे मुले लहान असतील, तर पाळणाघरात
ठेवली जातात किंवा घरात बसून दूरदर्शनवरील कार्यक्रम बघण्यात ती आपला वेळ घालवतात. यामध्ये त्यांना चांगले-वाईट सांगणारे कोणीही नसते.
राजकीय परिस्थिती
पूर्वीच्या काळी राजेसुद्धा धर्माचरणी असल्याने ते ऋषीमुनींच्या
मार्गदर्शनानुसार राज्यकारभार करत; पण सध्याचे राज्यकर्ते हे धर्माचरणी
नसल्याने हिंदु संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यास सक्षम नाहीत. शिक्षण
संस्था या राज्यकत्र्यांच्याच मालकीच्या असल्याने त्यातून संस्कारक्षम
विद्यार्थी तर सोडाच, चांगले परीक्षार्थी घडण्याची अपेक्षाही आपण करू शकत
नाही.
सध्याची शिक्षण पद्धती
प्रचलित शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी मानसिक रुग्ण बनत चालला आहे.
त्याला शिकण्यातील आनंद मिळण्यापेक्षा कटकटीच जास्त भेडसावू लागल्या आहेत.
त्याही पुढे आता पाठ्यपुस्तकातून वास्तवताच लोप पावत चालली आहे. त्यामुळे त्यांतून विध्यार्थ्यांवर संस्कार होण्याची सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत शिक्षकाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरते. भावी काळात
शिक्षक जर साधक झाला, तर समाजाला संस्कारक्षम शिक्षण तोच देऊ शकतो. मग
शिक्षकाने साधक व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे ?
दैनंदिन जीवनात घडणार्या प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधून त्यावर उपाय सांगणे, म्हणजेच साधना शिकवणे : अभ्यासक्रमाचे तात्त्विक अंग शिकवून विध्यार्थ्यांना आनंद
मिळू शकत नाही. त्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रत्येक गोष्टीचे
आध्यात्मिकरण करावे. दैनंदिन जीवनात घडणार्या प्रत्येक गोष्टीमागील
कारण शोधून त्यावर उपाय सांगणे, म्हणजेच साधना शिकवणे.
धर्माचरण आणि साधना : स्वतः नियमित धर्माचरण आणि साधना करून विध्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करावा. विध्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने साधना समजावून सांगण्याइतपत पुरेसे ज्ञान शिक्षकाला असले पाहिजे.
अभ्यासू वृत्ती : सतत सत्य जाणून घेण्याची इच्छा आणि त्यासाठी अभ्यासू वृत्ती बाळगणे
कृती : संस्कार करण्यासाठी केवळ उपदेश न करता कृतीतून शिकवणे
संस्कार आणि धर्माचरण शिकवण्यासाठी काही उपक्रम
अ. वर्गाच्या ग्रंथालयात संस्कार करणार्या आणि धर्मशिक्षण देणार्या पुस्तकांचा समावेश करणे
आ. शाळेच्या प्रशासकीय वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत संस्कारवर्गांचे आयोजन करणे
इ. पालकसभांचे औचित्य साधून पालकांशी विध्यार्थ्यांच्या प्रगतीसह संस्कार, धर्माचरण, तसेच साधना या विषयांवर चर्चा करणे
ई. शाळेतील बालसभांमधून (जयंती, पुण्यतीथी, इतर विशेष दिवस) धर्माचरणी व्यक्ती, संत, साधक यांचे मार्गदर्शन विध्यार्थ्यांना मिळण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजन करणे
उ. आपल्या सहकारी शिक्षकांना साधना सांगणे आणि दैनंदिन उपक्रमात त्यांचे सहकार्य घेणे
ऊ. कार्यानुभव सारख्या विषयांत देवालयांची स्वच्छता, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे, यांसारखे उपक्रम घेणे
एवढ्या गोष्टी जर शिक्षकाने केल्यास विद्यार्थी आणि समाज
सुसंस्कारीत होऊ शकतो. यातून शिक्षकाची समष्टी साधना होऊन ऋषीऋण आणि समाजऋण
फेडले जाऊन तो ईश्वरी कृपेस पात्र ठरेल.’
No comments:
Post a Comment